....आ.जयंत पाटील साहेब तुम्ही पण ?

महाराष्ट्र
 10 Aug 2019  742

अबब ....आ.जयंत पाटील साहेब तुम्ही पण ? 

* सोशल मिडीयावर जयंत पाटील ट्रोल 

* पुरग्रस्तांच्या मदतीवर स्वतःचे फोटो 

लोकदूत वेबन्यूज टीम 

सांगली 10 ऑगस्ट 

 भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी शासनाने जाहीर केलेल्या मदतीवर स्वतःचे फोटो आणि नाव असलेले स्टिकर लावून पुरग्रस्तांना  गहु तांदूळ देण्यात येत आहे. यामुळे आ.हळवणकर चांगलेच सोशल मिडिया ट्रोल झाले असून याचाच कित्ता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गिरवाला आहे.त्यामुळे जयंत पाटीलही सोशल मिडीयाच्या रडारवर आले असून अबब...जयंत पाटील साहेब तुम्ही पण ? असे विचारले जाऊ लागले आहे.

     कोल्हापुर सांगली येथील पुरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी तमाम महाराष्ट्रातील जनता पुढे सरसावली आहे. शिवाय शासनानेही मदत जाहीर केली.मात्र यावर भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांसह स्वतःचे फोटो लावून जाहिराबाजी करण्याचा खेळ खेळला. त्याचे पडसाद सम्पूर्ण महाराष्ट्रात उमटले असता, राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नेत्यांनी टीकेची झोड़ उठवली.

   परंतु याचाच कित्ता दस्तुरखुद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गिरवल्याने चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही अड़चन झाली आहे. जयंत पाटील यांच्याकडून पुरग्रस्तांसाठी खाद्य पदार्थ पाठवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवून आनत आहे. मात्र हे करीत असतांना पाठविण्यात येणाऱ्या बॉक्स वर आणि प्लास्टिक डब्यांवर स्वतःचे फोटो असलेले स्टिकर लावण्यात आले.त्यामुळे आमदार हळवणकर प्रमाणे जयंत पाटील यांनाही सोशल मिडियाने डोक्यावर घेऊन चांगलेच ट्रोल केले. यामुळे स्वपक्षीय कार्यकर्त्यांनीही तोंडावर बोट ठेवून अबब .....साहेब तुम्ही पण ? असा सवाल उपस्थित करुण नाराजी व्यक्त केली आहे.