विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे "संकल्प पत्र"

मुंबई
 15 Oct 2019  362

पाच वर्षात राज्यातील 1करोड़ युवकांना  रोजगार देणार 

* विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे "संकल्प पत्र" जाहीर 

* जे पी नड्डा,मुख्यमंत्री फडणवीस ,प्रदेशाध्यक्ष पाटील उपस्थीत 

लोकदूत वेबन्यूज 

मुंबई 15 ऑक्टोबर 

  राज्यात सुरु असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आगामी पाच वर्षात भाजप सरकारकडून केल्या जाणाऱ्या विकासात्मक कामाचे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या संकल्पपत्रात आगामी पाच वर्षात राज्यातील 1 करोड युवकांना रोजगार उपलब्ध करुण देण्यासह सन 2022 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी आणि पायाभूत सुविधेचाही संकल्प या संकल्पपत्रात जाहिर केला आहे. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

   यावेळी कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षातील उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करीत राज्याची भ्रष्ट राज्य म्हणून असलेली प्रतिमा बदलवून टाकली असल्याचे नड्डा म्हणाले. तर पायाभूत सुविधासह राज्यातील 1करोड युवकांना रोजगार देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.