गैरवर्तवणुक ; विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन

विधिमंडळ
 05 Jul 2021  533

* सभागृहात गैरवर्तवणुक केल्याचा ठपका

* आ.कुटे ,महाजन,रावळ यांचेसह 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित 

* 4 वेळा कामकाज तहकुब

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 जुलै 

ओबीसी आरक्षण प्रकरणी ठराव मंजूर घेतांना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गैरवर्तवणुक करुण राजदंड उचलणे आणि तालिका अध्यक्ष यांचेशी हुज्जत घालून गैरवर्तवणुक केल्या प्रकरणी भाजपचे तब्बल 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्याचा सत्ताधारी पक्षाचा ठराव विधानसभेत मंजूर झाला. यात भाजपचे नेते आशीष शेलार,डॉ संजय कुटे,गिरीश महाजन,राम सातपुते,पराग अळवणी, अभिमन्यु पवार,अतुल भातखळकर,हरीश पिंपळे,जयकुमार रावळ,योगेश सागर,नारायण कूचे,कीर्तिकुमार बागड़िया यांचा समावेश आहे. तर याचा निषेध करुण विरोधी पक्षाने कामकाजवार बहिष्कार टाकला.

         पावसाळी अधिवेशांच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डाटा मागविण्याबाबत ठराव मंत्री छगन भुजबळ यांनी मांडला. सदर प्रस्ताववार सत्ताधारीaआणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. सदर प्रस्ताववार विरोधी पक्षाला बोलू दिले जात नसल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी तालीका अध्यक्ष यांच्या आसनकाडे धाव घेत आक्रामक झाले. यावेळी सभागृहात चांगलाच गोंधळ झाला होता. या दरम्यान आमदार संजय कुटे,गिरीश महाजन यांनी अध्यक्षीय व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला असता तालिका अध्यक्षांनी त्यांना कायद्याचा धाक दाखवला.  परन्तु गोंधळ वाढल्याने ठराव मंजूर करुण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिट कामकाज तहकूब केले.

     त्यानन्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष यांच्या दालनात विरोधी पक्षाचे सदस्य गेले असता, त्या ठिकाणी तालिका अध्यक्ष यांचेवर धावून जाण्याचा प्रकार,आणि शिविगाळ केल्याचा प्रकार घडला असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितले.याबाबत आपण विपनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असता त्यांनीही आपल्या सदस्यांना आवरण्यास नकार दिल्याचे यावेळी सभागृहात सांगितले. यावर संसदीय कामकाज मंत्री  अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष यांचेवर धावून जाने,राजदंड उचलणे, तसेच सभागृहाच्या नियमाला बाधा आणणारे गैरवर्तवणुक केल्या प्रकरणी विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचे  निलंबन एक वर्षासाठी करण्याचा ठराव मांडला.याला सभागृहात मंजूरी घेत सदर ठराव मंजूर केला. यावर विरोधी पक्षाने सरकारला विरोधी पक्षाची संख्या कमी करायची आहे. असा आरोप करुण जो ठराव मांडला तो एकतर्फी असून सत्ताधारी हवा तो प्रस्ताव आणून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असल्याचे सांगत सदर प्रस्तवाचा निषेध करुण विपनेते देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगत सभात्याग केला.