राज्यपाल भगत सिंग कोश्यारी थेट मातोश्रीवर

मुंबई
 02 Jan 2020  445

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मातोश्रीवर पोहचले 

* मुख्यमंत्र्यांनी दिले होते स्नेहभोजनाचे निमंत्रण 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 2 जानेवारी 

  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज संध्याकाळी 8 वाजता थेट मातोश्रीवर पोहचले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना स्नेह भोजनाचे निमंत्रण दिले असल्याचे सांगण्यात येते. सत्ता स्थापनेपासून राज्यपाल आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.  शिवाजी पार्क वर झालेल्या मुख्यमंत्री यांचा शपथ सोहळा आणि नुक्ताच झालेल्या  विधानभवन येथील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना शपथ देत असतांना नियम सांगत आक्षेप घेत पुन्हा  शपथ घेण्यास भाग पाडले होते.

       या घटनेमुळे  आगामी  काळात राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार ओढ़ातान होणार असल्याचेही चर्चा सुरु झाली होती. मात्र आज संध्याकाळी अचानकच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थेट मतोश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले. परंतु ही भेट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्नेह भोजनासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात मात्र अस्वस्थता निर्माण करणारी आहे.यावरून  येत्या काळात राज्यात स्थिर सरकार चालवण्यासाठी राज्यपाल आणि सरकार यांच्यात पडलेलेले अंतर कमी होणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.