चोर सोडून संन्याशाला फासी - दरेकर

विधिमंडळ
 15 Mar 2022  485

चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम


*महाविकास आघाडी सरकार करत आहे

 

लोकदूत वेबटीम  
मुंबई  १४ मार्च 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा पर्दाफाश केला. परंतु ज्यांनी पर्दाफाश केला त्यांचीच चौकशी करण्यात आली. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला.  देवेंद्रजींनी उघड केलेल्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये जो अहवाल सादर झाला आहे त्याबाबत मविआ सरकारच्या माध्यमातून काय ऍक्शन घेतली जाणार आहे? याचे उत्तर सरकारने मात्र दिले नाही. पण ज्यांनी यागैरव्यवहाराचा पर्दाफाश केला त्याला दंडेलशाही करून नोटीस पाठविल्या जात आहेत असा आरोप करतानाच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम सरकार करीत असल्याची टिकेची झोड दरेकर यांनी केली.

 

विरोधी पक्षाच्या नियम २६० च्या प्रस्तावाला गृहराज्यमंत्री शंभुराज भोसले यांनी उत्तर दिले. गृहराज्यमंत्र्यांच्या उत्तरावर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात काही वक्तव्य केली. यामध्ये त्यांनी गुन्हा केला असे सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा देण्याचं काम न्यायालय करेल. मात्र, बॉम्बस्फोटातील आरोपीशी आर्थिक संबंध असणारी व्यक्ती मंत्रिमंडळात आहे यावर कधी कारवाई करणार? अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंत्र्याचा राजीनामा मविआ सरकार का घेत नाही? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. रघुनाथ कुचिक यांनी महिलेशी गैरवर्तन केले.  एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपशब्द वापरले. थेट पंतप्रधानांना मारू शकतो असं जहाल वक्तव्य केलं.  किरीट सोमय्या यांना आयटम गर्ल म्हटलं गेलं.  या सर्व विषयावर कारवाई का नाही?  महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याची टीका दरेकर यांनी केली. 

*एसटी कर्मचाऱ्यांविषयी सरकार असंवेदनशील*
एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.  हेच कर्मचारी आत्महत्या करतायत. असे असताना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत निर्णय अपेक्षित होते. मात्र एसटी कर्मचारी या महत्त्वाच्या विषयाकडे संवेदना कशा नाहीत असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.