गृहमंत्री अमित शाह व जे पी नड्डा यांची महाजनादेश यात्रेसाठी उपस्थिती

मुंबई
 27 Aug 2019  73

*महाजनादेश यात्रेसाठी मा. अमित शाह आणि मा. जे. पी. नड्डा यांची उपस्थिती*

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 27 ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापूर येथे 1 सप्टेंबर रोजी

होणार असून त्या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह

उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यात्राप्रमुख भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी

मंगळवारी दिली. तसेच महाजनादेश यात्रेच्या जालना येथे बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेस भाजपा

कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा उपस्थित राहतील, असेही मा. सुजितसिंह ठाकुर यांनी सांगितले.