डॉ.लहानेसह 8 डॉक्टरांना सरकारने दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबई
 04 Jun 2023  155
-मार्ड संघटनेच्या आंदोलनास अखेर यश
-जेजे मधील डाॅ. लहाने यांची सद्दी संपली
 
लोकदूत वेबटीम
मुंबई 4 जून
 
जेजे (j j hospitel )शासकीय रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने (dr. Tatyarao lahane)यांच्यासह ८ डाॅक्टरांचे राजीनामे राज्य सरकारने शुक्रवारी  मंजूर केले. त्यांच्या जागी तात्काळ नवी नियुक्ती करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. तसेच त्यांना न हटवल्यास सोमवार पासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. 
 
डॉ.. लहाने यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली की,जे जेतील निवासी डॉक्टरांच्या आरोपांच्या आधारे एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला. निवासी डॉक्टरांनी जे काही आरोप केले आहेत ते खोटे आहेत. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आमचे म्हणणे जाणून घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही ८ डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. 31 मे रोजी आम्ही ८ डाॅक्टरांनी राजीनामे दिले होते. 
 
डाॅ. तात्याराव लहाने यांच्यासह ८ डाॅक्टरांना पदावरून मुक्त करण्यात यावे. विभागातील पदे भरण्यात यावीत. निवासी डॉक्टरांचे थकित विद्यावेतन द्यावे, आदी मागण्या निवासी डाॅक्टरांच्या मार्ड (mard)संघटनेने केल्या होत्या.