ममता दीदींचे "जय मराठा,जय बांगला"

मुंबई
 30 Nov 2021  220

ममता बॅनर्जींनी दिला 'जय मराठा, जय बांगला'चा नारा

 -मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममतांच्या घोषणेचे महत्व
-आज ममता बॅनर्जी घेणार शरद पवार यांची भेट
-मुंबईतील बंगाली मतदार शिवसेनेच्या बाजुने उभे राहणार ?

लोकदूत वेबटीम

मुंबई 30 नोव्हेंबर 


तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी संध्याकाळी त्या प्रभादेवी येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. तसेच, 'जय मराठा, जय बांगला' असा नाराही त्यांनी दिला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला चारीमुंड्या चित करणाऱ्या ममता बॅनर्जी आज मुंबईमध्ये दाखल झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला उद्या ममतादीदी हजर राहणार आहेत. आज संध्याकाळी त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या. पण, मुख्यमंत्री अजूनही रुग्णालयात असल्याने ती हाेऊ शकली नाही.

ममतादीदींनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी ममतादीदींच्या हस्ते गणरायाची आरती पार पडली. यावेळी अभिनेते आणि मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ममतादीदींचे स्वागत केले. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी अनेकदा मुंबईत आले पण इथे यायला जमले नव्हते. अत्यंत प्रसन्न असे हे ठिकाण आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी  प्रार्थना आपण गणरायाकडे केली. सर्व लोकांनी मला खूप चांगले मुंबईचे दर्शन घडवले. यावेळी बोलताना ममतादीदींनी 'जय मराठा जय बांगला' असा नाराही दिली.

उद्या दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास वाय बी चव्हाण सेंटर येथे सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसोबत त्या बैठकीला हजर राहणार आहे.  त्यानंतर दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी त्या भेट घेणार आहे. त्यानंतर रात्री शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात त्या हजर राहणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी हॉटेल ट्रायडंट येथे राज्याचे पर्यटन मंत्री व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

मुंबई महापालिका निवडणुकीत सेना व भाजप यांच्यात थेट सामना आहे. बॅनर्जी यांचा भाजपशी थेट पंगा आहे. त्यामुळे ममता यांना शिवसेनेशी जवळीक वाटते आहे.

---------------------------
पालिका निवडणुकीत लाभ:
फेब्रुवारीत मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येणे आणि 'जय मराठा, जय बांगला' अशी घोषणे देणे शिवसेनेच्या पथ्यावर पडणारे आहे. मुंबईतला बंगाली मतदार सेनेच्या बाजुने उभा राहिली, अशी त्यामागे अटकळ आहे.
--------------------------------------------