राज्याच्या मुख्य सचिव पदी मनुकुमार श्रीवास्तव

मंत्रालय
 01 Mar 2022  482

लोकदूत वेबटीम 

मुंबई 28 फेब्रुवारी 

 

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवस्ताव यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1986 च्या तुकडीतील सनदी अधिकारी असलेले मनुकुमार श्रीवस्ताव यांना मुख्य सचिव म्हणून काम करण्यासाठी 14 महिन्याचा कालावधी मिळणार आहे.मावळते मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी मनुकुमार श्रीवस्ताव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

     राज्याच्या मुख्य सचिव पदावरून देवाशिष चक्रवर्ती हे  नियत वयोमानानुसार सोमवारी निवृत्त झाले. त्यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असतांना  अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आणि नितीन करीर हे मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत होते. मात्र राज्य सरकारने गृह विभागाची धुरा संभाळणाऱ्या मनुकुमार श्रीवस्ताव यांची जेष्ठतेच्या आधारावर मुख्य सचिव पदी नियुक्ती केली असून श्रीवास्तव हे 30 एप्रिल 2023 रोजी निवृत्त होणार आहे.

      मनुकुमार श्रीवस्तव  यांची महाराष्ट्र संवर्गात नियुक्ती झाल्यापासून रायगड जिल्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेची सुरुवात केली. उपविभागीय अधिकारी म्हणून रत्नागिरी, जिल्हा परिषद सीईओ धुळे,उप सचिव मंत्रालय पाणी पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर,नागपूर,नागपूर मनपा आयुक्त, अतिरिक्त मुख्य सचिव,महसूल विभाग,प्रधान सचिव नगर विकास विभाग,सचिव सामान्य प्रशासन विभाग, प्रधान सचिव उद्योग व ऊर्जा विभाग,  बृहन्मुंबई अतिरिक्त आयुक्त पदावर काम केले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी श्रीवास्तव यांची भारतीय पोलीस सेवेत 1985 तुकडीत निवड झालेली असतांना त्यांनी प्रशिक्षण अर्धवट सोडून पुन्हा परीक्षा दिली असता, 1986 च्या तुकडीत आयएएस संर्वागत त्यांची निवड झाली. श्रीवास्तव यांचा उत्तर प्रदेश मधील प्रतापगढ  येथील रहिवाशी असून 15 एप्रिल 1963 साली त्यांचा जन्म झाला.  यांचे वडील उत्तर प्रदेशात आयपीएस अधिकारी होते.