रखडलेल्या शिंदे सरकारचा अखेर विस्तार ; 18 नवे मंत्री

मंत्रालय
 09 Aug 2022  526

* भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी नऊ मंत्री 

* वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदी 

लोकदूत वेब टीम 

मुंबई 9 ऑगस्ट 

 

महाविकास आघाडी सरकार पाडून शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाचा आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर आज  मंगळवारी रोजी सकाळी 11 वाजता पार पडला. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या 18 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून यात वादग्रस्त ठरलेले. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तर दुसरीकडे सर्वोच न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात अपात्रतेची टांगती तलवार असलेले तानाजी सावंत,अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांचाही मंतीमंडळात समावेश करण्यात आला आहे. 

     राजभव येथील दरबार हॉल मध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे नऊ आणि शिंदे गटाचे नऊ अशा 18 मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजप चे फडणवीस सरकारमध्ये राज्य मंत्री असलेले रवीन्द्र चव्हाण आणि अतुल सावे यांना मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. तर मंगलप्रभात लोढा यांना थेट मंत्रीपदी वर्णी मिळालीaआहे. तर शिंदे गटात मंत्री झालेले शंभूराजे देसाई दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकार मध्ये राज्यमंत्री होते. 

 

भाजपचे मंत्री - राधाकृष्ण विखे पाटील,सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील,विजयकुमार गावित,गिरीश महाजन,सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे,मंगलप्रभात लोढा 

 

शिंदे गटाचे मंत्री - गुलाबराव पाटील,दादा भुसे ,संजय राठोड, संदीपान भुमरे,उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,शंभूराजे देसाई 

 

 

..........................................