मुंबईचे महापौर महाढेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करा -आ.ठाकुर

मुंबई
 06 Aug 2019  426

मुंबईचे महापौर महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा!: यशोमती ठाकूर

 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई,६ ऑगस्ट 

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गाऱ्हाणे सांगणाऱ्या मुलीचा हात धरून तिला धमकावण्याचा केलेला प्रकार हा संताप आणणारा असून त्यांना सत्तेचा माज चढल्याचे लक्षण आहे. या महापौरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

मुलीचा हात पकडून तिच्यावर दादागिरी करणाऱ्या महापौरांचा समाचार घेताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात नागरी समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्याकडे महापालिकेला लक्ष द्यायला वेळ नाही वरून महापौर लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे औदार्यही दाखवू शकत नाहीत. सांताक्रुझमधील पटेल नगरमध्ये विजेचा शॉक लागून आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तातडीने दखल न घेता महापौर दुसऱ्या दिवशी पटेलनगर मध्ये आले यावेळी संतप्त रहिवाशांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी जाब विचारणाऱ्या एका मुलीला हात पडकून महापौर महाडेश्वर यांनी तिला दमही भरला हे अशोभनीय आहे.

महिलांचा आदर करण्याचे साधे तारतम्यही शिवसेनेच्या या महापौराकडे नाही, समस्या ऐकून घेण्याची सहनशिलता नाही अशा महापौरावर कारवाई करण्याची गरज आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बेजबाबदार व उद्धट महापौरावर आता काय कारवाई करतात हेही पाहावे लागेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.