इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार - फडणवीस

मुंबई
 16 Nov 2021  203

लोकदूत वेबटीम 

मुंबई 16 नोव्हेंबर 

राज्याच्या  इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होणार आहे.अशा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. अशा शब्दांत  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या  सरकारवर टीका केली आहे.
भाजप प्रदेशा कार्यकारिणीचा समारोप करते वेळी फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,
राज्यात हजारो कोटी रूपयांची लूट सध्या सुरू आहे.   सध्याचे हे सरकार म्हणजे कायद्याचे राज्य नसून काय ते द्या...फक्त घेण्याचे, वसुली करण्याचे सरकार आहे. 
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे,ते पहाता या सरकारचा हात कोणी धरणार नाही.वसुलीपायी गृहमंत्री तुरूंगात आहेत. एवढ्यापुरते  हे  प्रकरणा सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आपल्याला कल्पना असेल गेल्या काही दिवसांत काही छापे पडले होते. आयकर  विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलेले आकडे हजार कोटीची दलाली, कुठे पाचशे कोटीची दलाली, कुठे चारशे कोटीची दलाली असे आहृत. या राज्याची हजारो कोटी रुपयांची लूट चालली आहे, वाटमारी चालली आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे,राज्यातील जनतेकडे मागे वळून पाहण्यास मात्र या सरकारला वेळ नाही. 
तिपुरातील घटनेवरून राज्यात उसवलेल्या दंगलीबाबत फडणवीस यांनी आघाडी सरकारल लक्ष्य केले.ते म्हणाले की हे मतासाठी केलेले पद्धतशीर षडयंत्र आहे.याबाबत त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यापासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की,राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
     माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मोदीजींनी देशात परिवर्तकारी बदल केले असून जनतेचा विश्वास हीच त्यांची पूंजी आहे, असे ते म्हणाले.
     यावेळी भाजपाचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी  भाजपा राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी जी, राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे आणि जयभानसिंह पवय्या, माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व माजी मंत्री आशिष शेलार व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आदी नेते एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीत सहभागी झाले होते.