संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई
 09 Nov 2021  188


* दिलीप वळसे पाटील यांच्याशीही पवारांची चर्चा


लोकदूत वेबटीम 

मुंबई 9 नोव्हेंबर 

राज्यातील राजकीय घडामोडी आता वेगाने होउ लागल्या आहेत.शिवसेना खा.संजय राउत यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.ही भेट खासगी स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यानंतर राज्याचे ग़हमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली.या भेटीच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते.

शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत नक्की काय चर्चा झाली याचा तपशील पुढे आलेला नाही.मात्र सध्या सुरू असलेले ड्रग्ज प्रकरण,एनसीबीची कारवाई या विषयावर शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान,संजय राउत यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली.ही भेट खासगी स्वरूपाची होती.मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राउत गेले असल्याचे समजते.मात्र यावेळी राजकीय स्वरूपाची चर्चा झाल्याचे नाकारता येत नाही.