राज्यपाल कोश्यारींनी व्यक्त केला शोक

मुंबई
 17 Jan 2021  253

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना  दु:ख

लोकदूत वेबटीम 

मुंबई 17 जानेवारी 

 

 ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsinh koshyari)यांनी दुःख व्यक्त केले आहे. पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या बहुविध योगदानामुळे भारतीय शास्त्रीय संगीत विश्व समृद्ध केले.  उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी उत्तमोत्तम शिष्यांच्या पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनामुळे एक महान शास्त्रीय संगीतकार व तितक्याच थोर व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहो. दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय, चाहते तसेच शिष्यांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.