अखेर प्रविण परदेशी यांची युएन मध्ये नियुक्ती

मुंबई
 04 Aug 2020  255

* 11महिन्यांसाठी प्रविण परदेशी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती 

* मानहानिकारक बदली केल्याने होते नाराज 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 4 ऑगस्ट 

राज्याचे नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची अखेर युएन मध्ये नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश निर्गमित केले असून 11 महिन्यासाठी सदर नियुक्ती राहणार आहे.

   बृहन्मुम्बई मनपा आयुक्त पदावरून मानहानिकारक पद्धतीने उचलबांगड़ी केल्या नंतर परदेशी यांची नगर विकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली होती.  तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोविड बाबत आयोजित केलेल्या बैठकीत परदेशी यांच्याशी शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर बदली झाल्याने 15 दिवस परदेशी हे हजर झाले नव्हते. या वादाला मेहता विरुद्ध परदेशी अशी किनार असल्याने परदेशी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार असल्याची चर्चाही झाली होती. त्यानंतर त्यांना युएन मधूनही निमंत्रण असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र मुख्य सचिव पदावरून निवृत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून अजोय मेहता यांनी आपली नियुक्ती करुण घेतल्यामुळे आणखी वाद वाढणार असल्याच्या चर्चेला उधान आले होते. त्यामुळेच प्रविण परदेशी यांनी मेहता गटांशी झुंज देण्या पेक्षा त्यांनी युएन ला जाण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार त्यांची केंद्र सरकारने समन्वयक,ग्लोबल प्रोग्रामर म्हणून नियुक्ती केली आहे.