भारताच्या मदतीला इंडियाने धावून येण्याची "तेरवं"ने घातली साद, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात पोहचल तेरव

मुंबई
 21 May 2019  32

मुंबई लोकदूत वेबटीम 

आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील महिलांच्या जगण्याचे वास्तव "तेरवं" या नाटकाने जगासमोर  आणलं आहे. यातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची विदारक परिस्थिती समोर येत असून खऱ्या  ग्रामीण जीवनाचा परिचय   शहरी भागाला करून दिला जात आहे.  वास्तवात असलेल्या ग्रामीण भारताचं चित्र हे  इंडियाला समजावं आणि इंडियाने मदतीचा हात भारतापुढे करत,भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत.याची जाणीव नक्कीच करून देणार तेरवं.....

आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 19 मार्च हा दिवस सत्ता उपभोगत असलेल्या किंवा उपभोगलेल्या लोकांना आठवेल की नाही हे माहीत नाही. प्रचाराच्या भोंग्यात 19 मार्च दुःख कुणाला ऐकू जाईल हे ही माहीत नाही. ज्या अन्नदात्त्याच्या मेहनतीवर अन्न खात जीवन जगणाऱ्या, मोठमोठ्या आकडा असलेल्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या  तसेच विक एंड ची वाट पाहून आपली मौज मस्ती करत आनंद घेणाऱ्या तरुणाईला कृषिप्रधान देशात आणि राज्यात 19 मार्च हा दिवस विचारला तर उत्तर मिळेल की माहीत नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या अडचणी , त्याची दयनीय अवस्था शासन आणि राज्य व्यवस्थेला कळावी म्हणून विदर्भातील वर्धा जिल्ह्यात साहेबराब करपे या शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासह 19 मार्च 1986 ला आत्महत्या केली, या सामूहिक आत्महत्या ने सारा देशच हादरला. या घटनेपूर्वी आंध्र कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, पण आर्थिक विवंचनेतून साऱ्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळून घ्यावं हे विदारक वास्तव 19 मार्च 1986 ला जगासमोर आलं. )  परंतु मूळ शेतकरी कुटुंबातून असलेल्या आणि शहरी भागात जगणाऱ्या शेतकरी पुत्रांनी तरी 19 मार्च या दिवसाची  आठवण करावी एवढीच साद तेरवं या नाटकातून पांढऱ्या कपाळाचे जगन आलेल्या माता भगिनींनी केली आहे.


मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या "वसंत राष्ट्रीय नाट्यमहोत्सव" मध्ये "तेरवं"या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकात शेतकऱ्यांच्या अडचणी,त्यामुळे होत असलेल्या आत्महत्या आणि त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि मुलींना सहन कराव्या लागणाऱ्या यातना या नाटकातून जगासमोर आणल्या आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जगाला कळावे. ही व्यवस्था बदलावी म्हणून करपे कुटुंब हुतात्मा झालं. पण  व्यवस्था बदलली का ?  त्यापेक्षाही व्यवस्था अधिक निगरगट्ट आणि कोडगी झाली असल्याचे मागील काही वर्षांपासून आपण पाहत आहोत.


1986 पासून माहीत नाही. पण शेतकरी आत्महत्याची शासन दरबारी 1995 ला नोंद झाल्यापासून  तर आजपर्यंत या देशात सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यात सर्वाधिक 65 हजार आत्महत्या या एकट्या महाराष्ट्र मध्ये झाल्यात. 


शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर प्रश्न मिटला का ? तर नाही तो अधिक जटील बनलाय. त्याच्या कुटुंबाची होणारी वाताहत, एकटी जगणारी स्त्री, तिची कौटुंब आणि सामाजकडून होणारी अवहेलना एक ना अनेक प्रश्न उभे राहिलेत.  त्यातूनच लेखक श्याम पेठकर आणि दिग्दर्शक ऍग्रो थेअटर चे हरीश इथापे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनाच चक्क पात्रात सहभागी करून घेत "तेरवं" मांडलं आहे.

दुष्काळ, नापिकी , सावकाराच कर्ज, शेतकऱ्यांची आत्महत्या याची मांडणी करत नाटकाला सुरवात होते.  कर्जामुळे केलेली आत्महत्या ,  लोक लाजे खातर पुन्हा सावकाराकडून कर्ज घेऊन कुटुंबाने केलेली शेतकऱ्यांची तेरावं (तेरवं) याचा आधार घेत नाटकं उभं राहिलंय. आत्महत्या नंतर प्रश्न संपला का ? हा नवा प्रश्न घेऊन नाटक उभं राहतं. शेतकरी आत्महत्ये नंतर त्याची विधवा पत्नी , तिची कुटुंबातील अवहेलना, समाजाचा तीच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन ,  महिलेला दोषी ठरवणारी समज व्यवस्था, हुंडा , हुंड्या मुळे मेलेला तिचा बाप , माझा बाप जिवंत राहावं म्हणून जीवन सम्पवणारी मुलगी अस एकाहून एक प्रसंग या नाटकांने व्यासपीठावर जिवंत केलेत..


नाटकातील प्रसंग जिवंत होण्यामागे कारणंही तशीच आहेत. या नाटकात ज्यांनी विविध भूमिका केल्यात ती पात्र वास्तव आहेत. वयाच्या अवघ्या 20, 22 अथवा जास्तीत जास्त 25 च्या वयोगटातील शेतकरी विधवा आणि त्यांच्या लेकिनी या भूमिका साकारल्या आहेत. केवळ संवाद नाहीत. लोकगीत आणि जात्यावरच्या गाण्यांचा आधार मिळालाय. म्हणूनच वास्तवातल जगणं त्याला वैदर्भीय भाषेची धार थेट प्रेक्षकांच्या काळजात घुसते. 


केवळ नकारात्मक भावना मांडून अथवा प्रश्न उपस्थित करून हे नाटक थांबत नाही. समज प्रश्न सोडवेल का? ही राज्य आणि शासनव्यवस्था ते सोडवेल का ? याच उत्तर नकारात्मक आहे.  पण आत्महत्याग्रस्त महिलांनी एक मेकींना आधार देत सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधल्याचा सकारात्मक संदेशही हे नाटक दिला आहे हे विशेष....

मुख्यमंत्री पॅकेज, पंतप्रधान पॅकेज आले , त्यात भर पडत गेली. पॅकेज च्या गाई म्हशी , योजना शेतकऱ्यांच्या नव्हे तर पुढरीच्या दावणीला बांधली गेली. भ्रष्टाचार मधून 400 अधिकारी निलंबित केली. पण निलंबन अजून तसच ठेवत ती पुन्हा सत्तेत तशीच राहिली... 

प्रश्न तेंव्हाही होता आणि पुढेही कायम राहील. करण प्रश्न सुटला तर या राज व्यवस्था आणि शासन व्यवस्थेची गरज भासणार नाही. म्हणून प्रश्न सोडवायचे असतील तर तुझा हात माझ्या हातात घ्यावा लागेल. तुझं दुःख मला समजून ग्याव लागेल. हा या नाटकाचा संदेश आहे. 

या महिलांनी हिंमत दाखवत केवळ दुःख व्यासपीठावर मांडलं नाही. तर हिमतीने जगा हा संदेश दिलाय.