देवाशिष चक्रवर्ती आता पूर्णवेळ मुख्य सचिव

मंत्रालय
 15 Feb 2022  437
देवाशिष चक्रवर्ती राज्याचे पूर्णवेळ मुख्यसचिव

लोकदूत वेबटीम 

मुंबई 15 फेब्रुवारी 

गेली अडीच महिने राज्याच्या मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांना सोमवारी राज्याचे पूर्णवेळ मुख्य सचिव म्हणून राज्य सरकारने आदेश निर्गमित केले आहे. सोबत चक्रवर्ती यांचेकडे नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त पदभार सोपाविण्यात आला आहे.

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान मुख्य सल्लागार पदी असलेले सीताराम कुंटे हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नियोजन विभागाच्या अतिरिक्त सचिव पदावर नियुक्त असलेले देवाशिष चक्रवर्ती यांचेकडे मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त पदभार सोपाविण्यात आला होता. राज्यातील प्रशासनात पूर्णवेळ मुख्य सचिव पदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष केंद्रित झाले होते. येत्या 28 फेब्रुवारी रोजी  देवाशिष चक्रवर्ती हे निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्य सचिव अतिरिक्त कार्यभार पदावरून  चक्रवर्ती निवृत्त होणार का? असा सवाल उपस्थित करून प्रशासनात चर्चा सुरु झाली होती.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्य सचिव पदावर दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पासून पूर्णवेळ मुख्य सचिव म्हणून नमूद करीत त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.

 

     परंतु याच महिन्याखेर निवृत्त होणाऱ्या चक्रवर्ती यांना पूर्णवेळ पूर्वलक्षी प्रभावाने मुख्य सचिव म्हणून आदेश निर्गमित केल्यामुले मुख्य सचिव पदी 3 महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे पाठवू शकते अशी चर्चा जोरदार निर्माण झाली असून मुख्य सचिव पदासाठी गेल्या 2 महिन्यापासून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवस्ताव,वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक हे प्रयत्न करीत आहे.