मुंबई महानगर,पुणे,नागपुर,पिंपरी चिंचवड़ क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार -मुख्यमंत्री

मुंबई
 20 Mar 2020  368

* शासकीय कार्यालयात आता 25 टक्केच उपस्थिती राहणार

* खाजगी कार्यालयाच्या मालकांनी कर्मचाऱ्यांचे पगार न कापता माणुसकी दाखवावी 

* मुख्यमंत्र्यांचे आव्हान 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 20 मार्च 

 राज्यात एकूण 52 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळले असून राज्यातील चार महानगरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. यासाठी  मुंबई महानगर परिसर,नागपुर,पुणे,आणि पिंपरी चिंचवड़ या प्रमुख शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व कार्यालय आणि दुकाने 31 मार्च पर्यंत  बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे.

         या जगातील युद्धाच्या रणांगणात राज्यातील अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर,नर्सेस, वॉर्ड बॉय हे अत्यंत जबाबदारीने लढत  असून जगण्यासाठी धडपडणे आपण नेहमीच करत असून आता जगण्यासाठी थांबणे महत्वाचे आहे. जी कार्यालय बंद होणार आहे त्यांनी कृपया कर्मचाऱ्यांचे पगार कापू नए. माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. वर्क फ्रॉम होम यावर खाजगी कार्यालयाने भर द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.लोकल आणि बस सेवा बंद करने शक्य होणार नसून अत्यावश्यक सेवा करणारे कर्मचारी अधिकारी तसेच मनपा कर्मचाऱ्यांना आपल्या घरुन रुग्णालयात  कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वहतुकीचा वापर करावा लागतो. त्यामुळे जनतेने स्वतःहुन घरात थांबावे असे आवाहन यावेळी केले.