मंत्री पदासाठी भाजप आमदारांचे लॉबिंग

मुंबई
 02 Nov 2019  722
मंत्रिपदाची भाजप आमदारांची लॉबिंग

* मंगळवारी होणाऱ्या शपथविधीसाठी लॉबिंग
* चंद्रकांत पाटील,कुटे,महाजन,मुनगंटीवार निश्चित

लोकदूत वेबन्यूज
मुंबई 2 नोव्हेंबर

येत्या मंगळवारी दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. वानखेडे स्टेडियमयेथे पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकूण 9 ते 10 आमदारांची मंत्री पदावर वर्णी लावण्यात येणार आहे. यात आपला समावेश व्हावा यासाठी भाजपचे नेते आमदार जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. सोबत 10 आमदारांना मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे. पहिल्या दहा मंत्र्यांच्या यादीत कुणाचा समावेश करायचा, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला या कामासाठी नेमले आहे. विभागीय समतोल, आणि सामाजिक समतोल तपासून या पदाधिकाऱ्यांने विविध स्तरावर चौकशी करणे सुरू केले आहे. परंतु पहिल्या शपथविधी सोहळ्यात आपली मंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी भाजप च्या अनेक इच्छुक आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. त्यासाठी मुंबई दिल्ली वारीही सुरू झाली असून आपल्या वरदहस्तांकडे साकडे घालायला सुरुवात केली आहे.
मंगळवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळी शपथविधी वानखेडे स्टेडियम येथे पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार असून मंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे,गिरीश महाजन,सुभाष देशमुख,सुरेश खाडे, अतुल सावे ,आशिष शेलार,योगेश सागर यांचे नाव निश्चित झाले आहे. शिवाय पंकजा मुंडे यांच्या नावावर चर्चा सुरू असून त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशोक उईके,मदन येरावर,परिणय फुके, बबनराव लोणीकर यांच्या नावावरही चर्चेच्या फैरी सुरू असून यापैकी कुणाची पहिल्या शपथविधीत वर्णी लागणार ? हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.