4 नोव्हेम्बर नंतर महाराष्ट्रात होणार राजकीय उलथापालट

मुंबई
 01 Nov 2019  475
  4  नोव्हेंबरनंतर राज्यात होणार राजकीय उलथापालट 

#  शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट

लोकदूत वेबन्यूज 

मुंबई 2 नोव्हेम्बर 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार असल्याने त्यानंतर राज्यात शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या विषयाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच राज्यात राज्यात सत्ता स्थापनेसाठी ४ नोव्हेंबर रोजी एका नवीन राजकीय समिकरणाचा उदय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपल्याला मुख्यमंत्री पद हवे ही अट टाकून शिवसनेने भाजपाला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे भाजपासोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही प्रकारच्या चर्चा आणि त्यासाठीच्या प्रस्तावार भूमिका घेण्यास सेनेने अद्याप तरी नकार दिला असल्याने भाजपाची मोठी अडचण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मदत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच काल शिवसेनेचे नेते संजय राऊत व काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर यासाठी आज काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्या राज्यातील सर्व घडामोडींविषयी चर्चा झाली. मात्र  पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जे निर्णय घेतील ते काँग्रेससाठी मान्य असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले असल्याने  आज दिल्लीत झालेल्या या बैठकीत सेनेला पाठिंबा देण्याविषयीचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांच्या उपस्थितीत ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भेटीदरम्यान घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.