स्व.बाळासाहेबांची मातोश्री राहिली नसून सत्तेसाठी हपापलेली मातोश्री

महाराष्ट्र
 08 Aug 2019  467

स्व.बाळासाहेबांची मातोश्री राहिली नसून सत्तेसाठी  हपापलेली मातोश्री 

* विरोधी पक्षनेते यांचा शिवसेनेवर हल्ला 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 8 ऑगस्ट 

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरुण राज्यातील माणसांच्या हृदयात जी शिवसेना निर्माण केली, ती मातोश्री आता राहिली नसून सत्तेसाठी हपापलेली मातोश्री असल्याचा हल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

ज्या कोल्हापुरकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान करुण आमदार आणि खासदार निवडून दिले.त्याच कोल्हापुरकरांना महापुरात बुडणयासाठी सोडून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मातोश्रीवर मताच्या राजकारणासाठी पक्ष प्रवेश सोहळा ठेवला. त्यामुळे मत देणाऱ्या जनतेसाठी शिवसेना काम करत नसून सत्ता काबिज करण्यासाठीच शिवसेना आग्रही असल्याने दिसून येत असल्याचेही आरोप यावेळी केला.

कोल्हापुरकरांना महापुराने चहुबाजूने घेरले असून त्यांना त्यातून वाचविण्यासाठी कुठलेली पाऊल न उचलता सत्ता मिळविण्यासाठी कॉंग्रेसचे नेते शेखर गोरे यांचा शिवसेना प्रवेश  सोहळा मतोश्रीवर ठेवण्यासाठी अधिक रस असल्याचे यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.