ईव्हीएम विरोधी लाँगमार्चला पोलीसांनी परवानगी नाकारली

महाराष्ट्र
 07 Aug 2019  380

लोकदूत वेबन्यूज़ टीम

मुंबई 7 ऑगस्ट 


ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने येत्या ९ ऑगस्ट २०१९ रोजी  मुंबईतही काढण्यात येणाऱ्या लाँगमार्चला आज पोलिसांनी परवानगी नाकारली. यासाठी पोलिसांकडून सुरक्षेचे कारण देत मुंबईत काढण्यात येणाऱ्या या लाँगमार्चला परवानगी नाकारून लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
देशभरात, ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यासाठी राज्यातील बिगर राजकीय सामाजिक संघटनांनी जोरदार तयारी केली हेाती. त्यासाठी काही राजकीय पक्ष संघटनांनीही या जन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला होता. हा लाँगमार्च ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट ग्रांट रोड येथील क्रांती मैदान ते चैत्यभूमी यादरम्यान काढण्यात येणार होता. मात्र आता पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने याविरोधात संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकार आमच्या या आंदोलनाला घाबरले असल्याने त्यांनी  पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या जनआंदोलनातील कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी केला आहे. 
या लाँगमार्चमध्ये प्रामुख्याने  मध्ये विविध सामाजिक, राजकीय जनसंघटना, आदिवासी, विद्यार्थी, शेतकरी, कामगार संघटना आणि प्रमुख राजकीय पक्षाचे प्रतिनिधीही सामील होणार होते. तर मुंबईसह नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी परिसरातून अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सामील होणार होते.