कौटुंबिक हिंसाचार, छळाच्या घटनेची वस्तुस्थिती*

विधिमंडळ
 05 Mar 2020  662
कौटुंबिक हिंसाचार, छळाच्या घटनेची वस्तुस्थिती*
*सभागृहाला कळाली पाहिजे
 
लोकदूत वेबटीम
मुंबई ५ मार्च
 
महिला दिनाच्या निमित्ताने आज विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या विशेष प्रस्तावानिमित्त विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी कौटुंबिक हिंसाचर, सुनेचा छळ या घटनांचा संदर्भ देत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी अमान्य केल्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला व आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.
विधानपरिषदेमध्ये सभापती महोदयांचा प्रस्ताव आज उपसभापती निलम गो-हे यांनी मांडला. महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महिलाच्या शाश्वत विकासाची उदि्दष्टये व महिला सक्षमीकरण याबाबत स्त्रियांच्या सामाजिक विकास येत असणारे अडथळे आदी विषयांच्या अनुषंगाने उपसभापतींनी या प्रस्ताव मांडला.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. महिला दिनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या महिलांच्या विषयांचा अंर्तभाव असणा-या प्रस्तावावर चर्चा व्हायला हवी असे स्पष्ट केले. परंतु त्याच वेळी एखाद्या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडत असेल व सासूकडून सुनेचा अतोनात छळ होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. आज जर या प्रस्तावाच्या निमित्ताने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी सुनेकडून छळ होत आहे, प्रसिध्दी माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या प्रसिध्द होत आहे, त्यामुळे यासंदर्भातील वस्तुस्थिती सभागृहासमोर आली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली. पण यावरुन सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी आपली मागणी लावून धरली व घोषणाबजी केली. विरोधक वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होत. यावेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षांची बाजू मांडण्याची मागणी सातत्याने विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी वारंवार केले. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सभागृहात वस्तुस्थिती मांडण्यात आली पाहिजे. त्या घटनेमध्ये सासूकडून सुनेचा काय छळ झाला आहे, त्या सुनेला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी केली. त्यामुळे गदारोळ वाढला व सभागृहाचे कामकाज आधी १० मिनिटा करित व नंतर ५ मिनिटा करिता तहकूब करण्यात आले. अखेर या गदारोळातच उपसभपतींना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.