पैशाचे सोंग न आणता प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री

विधिमंडळ
 06 Mar 2020  678

पैशाचे सोंग न आणता प्रगतीकडे नेणारा अर्थसंकलप - मुख्यमंत्री

लोकदूत वेबटीम 

मुंबई ६ मार्च

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. पैशाचे सोंग न करता राज्याला प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तीन वेगवेगळ्या विचारांचे असलेले पक्ष एकत्रित येऊन सत्तेत विराजमान झाले. या तिन्ही पक्षांच्या एका विचाराने एकत्रित असलेला हा र्थसंकल्प असल्याने विरोधी पक्षांची चिंता आता मिटलेली असेल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीच्या सरकारला राज्याच्या सत्तेत विराजमान होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहे. याच दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडल्याचा आनंद आहे. राज्यात महाविकास आघाडी करून तिन्ही पक्ष एकत्र आलो. त्यामुळेच हा सर्वसमावेशक अर्थसंकप असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत शिक्षण,पाणी,उदयॊग,शेती याचा सारासार विचार केलेला आहे. सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे सर्वत्र निरुत्साहाचे वातावरण असून तारेवरची कसरत नेहमीच करावी लागणार आहे. तरीही आम्ही अर्थसंकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबध्द आहोत. त्यामुळे आता दुसरे पुस्तक वाचून समजून घ्यायची गरज नाही. असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या अर्थसंकप - सोप्या भाषेत या पुस्तकावरून लगावला.