11वीच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदत वाढली

महाराष्ट्र
 19 Oct 2021  185

* मुदत २१ पर्यंत वाढवली
-सुट्ट्या आल्याने मुदत वाढवण्यात आली

लोकदूत वेबटीम 
मुंबई 19 ऑक्टोबर 


राज्यातील 'महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या इ्यत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील प्रवेश फेरी मुदत गुरुवार 21 आॅक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, शिक्षण संचालनालयाने कळवले आहे.

यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार १८ आॅक्टोबर रोजी फेरी समाप्त होत होती. तथापि काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करावयाचा आहे, तसेच काही विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत. दरम्यायानच्या काळामध्ये काही सुट्या आलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही प्रेवशापासून वंचित राहू नये यासाठी यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

वाढीव कालावधीमध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण असलेले सर्व तसेच एटीकेटी विद्यार्थी पात्र असतील. दिलेल्या वाढीव वेळेमध्ये उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत. इयत्ता १०वी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे इयत्ता ११वो प्रवेशाबाबत पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

काही शिक्षण मंडळाच्या गुणपत्रात शासन आदेशानुसार विषयांसमोर केवळ पास असे नमूद आहे, सबब गुणपत्रिकेवर गुण नमूद नसतील अथवा श्रेणी ही नमूद नसतील, केवळ पास असे नमूद असेल तर अशा विद्याथ्र्यांनी उत्तीर्ण साठी किमान गुण (३५% प्रमाणे) एकूण गुण गृहीत धरून ऑनलाईन अर्ज भरावेत.

ज्या विद्यार्थ्यांना इ.१०वी मध्ये एटीकेटी सवलत मिळालेली आहे त्यांना ११ वी प्रवेशासाठी (इंग्रजी विषयात एटीकेटी असेल तरीही) अर्ज भरता येतील. या विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे.
-----