राज्यातील ड वर्ग मनपा मध्ये 10 अति.आयुक्तांची पदनिर्मिती

मंत्रालय
 30 Jun 2021  730

* मनपा अधिकाऱ्यांना मिळणार बढती 

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 30 जून 

राज्यसरकारच्या नगरविकास विभागाने राज्यातील तब्बल 10 ड वर्ग महानगरपालिका मध्ये अतितिक्त आयुक्त पदाची नव्याने पदनिर्मिती  करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे या 10 ड वर्ग मनपा संवर्गातील उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना आता अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती मिळणार आहे. 

     राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने राज्यातील सोलापुर,मिरा भाईन्दर,अमरावती,भिवंडी निजामपुर,नांदेड़ वाघाळा,कोल्हापुर,अकोला,पनवेल,उल्हासनगर आणि सांगली मिरज या दहा महानगर पालिकेला या पदनिर्मितीचा फायदा होणार असून याठिकाणी 2 अतिरिक्त आयुक्त पद निर्माण होणार आहे. त्यामुळे या शासन आदेशामुळे त्या त्या मनपातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.