मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे तर सचिन सावंतांचा राजीनामा

महाराष्ट्र
 19 Oct 2021  187

- प्रदेश काँग्रेसमध्ये नव्या नियुक्तीवरुन रुसवेफुगवे
- विदर्भातील अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी वर्णी

लोकदूत वेबतीम 

मुंबई 19 ऑक्टोबर 


पत्रकार परिषदा, समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या माध्यमांतून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे प्र्रदेश काँग्रेसचे माध्यम प्रमुख सचिन सावंत यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, असे पत्र पक्षश्रेष्ठींना पाठवल्याचे समजते. प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्याने सावंत यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची फेररचना केली आहे. त्यामध्ये माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये सचिन सावंत यांचा समावेश आहे, मात्र, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आली आहे.

सावंत वरिष्ठ व अनुभवी आहेत. मात्र त्यांना आता लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. नव्या बदलामुळे सावंत नाराज झाले आहेत. परिणामी त्यांनी प्रवक्ते पदातून मुक्त करावे, असे पत्र त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना पाठवले आहे.
------
सचिन सावंत कोकणातील असून ते माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या विदर्भातील व मर्जीतील अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदावर वर्णी लावल्याचे समजते.