मविआ मध्ये बहुप्रभाग पद्धतीवरून मतभेद

महाराष्ट्र
 20 Sep 2021  203

महाविकास आघाडी त बहुप्रभाग पध्दतीबाबत मतभेद      

   लोकदूत वेबटीम 

मुंबई 20 सप्टेंबर 


 भाजप  सरकारच्या काळात महापालिका मध्ये लागू करण्यात आलेल्या  बहुसदस्यीय प्रभाग पध्दती एवजी पुन्हा एकसदस्यीय पध्दत लागू करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक  झाली . यावेळी नव्याने लागू करायच्या पध्दतीबाबत तीनही पक्षांची भुमिका जाणून घेण्यात आली मात्र त्यातून सर्वसहमती होवू शकली नसल्याने कोणताही निर्णय  झाला नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रानी दिली  उद्या पुन्हा या बाबत बैठक  होणार असून त्यात सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न  केला जाईल असे या सूत्रानी सांगितले. शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात नव्या पध्दतीबाबत काही मतभेद आहेत तर कॉँग्रेसची  स्वबळाची तयारी असल्याने त्यांचा याबाबतचा  दृष्टीकोन  वेगळा असल्याचे सूत्रांचे मत आहे.
काँग्रेसला एक सदस्य, राष्ट्रवादीला दोन तर शिवसेनेला चार सदस्य प्रभाग सदस्य पद्धत हवी आहे. आघाडी सरकारने मध्यंतरी एक सदस्य प्रभाग पद्धत लागू केली आहे.