विप नेते फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात

मंत्रालय
 10 Jan 2021  579

* फडणवीस, चंद्रकांतदादांची सुरक्षा कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीचा 
* भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

लोकदूत वेबटीम 

मुंबई 10 जानेवारी 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस( devendra fadanvis),भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील( chandrakantdada patil)विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर( pravin darekar) यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे, अशी टीका भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी केली आहे.
   उपाध्ये यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाआघाडी सरकारने या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे.कोरोना काळात व त्याआधीही देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते.त्या काळात मुख्यमंत्री (chief minister)घरात बसून होते. भंडारा येथेही फडणवीस हेच सर्वप्रथम धावून गेले.
राज्य सरकारने या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम करतच राहतील, असेही उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.