सरकार पाडण्यास आम्हाला रस नाही..- विप नेते फडणवीस

महाराष्ट्र
 26 May 2020  68


* विप नेते फडणवीस यांचे स्पष्टीकरण 


* सरकार अंतर्गत विरोधामुळेच पडणार 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 26 मे 

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी राष्ट्रपती रजावट लागू करण्याचा मुद्दा तयार केला आहे. मात्र भाजपला महाराष्ट्रात सत्ता पाडण्यात रस नसून कोरोना नियंत्रणासाठी लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे दिवसभरापासून सुरु असलेल्या राष्ट्रपती राजवट लागु करण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 
               सोमवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मतोश्रीवर गुप्त बैठक झाली होती. त्या नंतर राज्यात राज्य सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या होत्या. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत , मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची बिकट परिस्थिती असून रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाही. रुग्ण वाहिका मिळत नाही. त्याच बरोबर खाजगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचे सांगत कोरोना नियंत्रणात आणण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा  प्रयत्न असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारही कोरोना परिस्थितीत मग्न असून आम्ही कोणतीच हालचाल न करता कुठल्याही प्रकारचा दबाव टाकत नसल्याचा खुलासा केला. भाजपला सरकार पाडण्यात रस नसून त्यांच्यातच अंतरकलह निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूण वाढती कोरोना परिस्थिती पाहता, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे वक्तव्य केले. यातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोडून कॉंग्रेस यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत  असल्याचा आरोप केला. तीन पक्षाच्या सरकार मध्ये शिवसेनाaआणि राष्ट्रवादी पक्षाचेच नेते मीटिंग करतात. कॉंग्रेस कुठेच दिसत नसून  त्यामुळे सरकार हे यांच्याच समन्वयाच्या अभावामुळे पडणार असल्याचा पलटवार यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर केला. कोरोनासाठी राज्य सरकार केंद्रसरकारकडून आलेले पैसेही खर्च करू शकत नसल्याचे सांगत राज्य सरकारचे काम करतांना प्राधान्य वेगळे असल्याची टिका केली. एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकारला राजकीय खंबीर नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले. 
          राज्य सरकार कोरोनाशी लढतांना विरोधी पक्षावर टिका करत असून सरकार विरोधी पक्षाला विश्वासात घेत नसल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला. कोरोनापेक्षा विरोधी पक्षच मोठा शत्रु असल्याचे सरकार मानत असल्याचे मत व्यक्त करुण सरकारला विरोधकांना सोबत घेवून काम करण्याची मानसिकता सरकारची नसल्याचा आरोप  यावेळी केला. 
     राज्यात 2 सत्ताकेंद्र निर्माण केल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहे. मात्र जे हे काम करत आहे त्यांना संविधानाचा अभ्यास नसल्यामुळेच असे कृत्य करत असून राज्य सरकार हे राज्यपालांच्या नवाने राज्यकारभार करत असते. राज्यपाल हे कटपुतली नसून घटनात्मक पद आहे.आपण राजभवन वर आजवर फ़क्त चार वेळा गेलो असून विरोधी पक्षाला या सरकारमध्ये संपर्काचे मध्यमाच उपलब्ध करुण दिले नाही. त्यामुळे राज्यपाल यांनाच भेटून म्हणणे मांडावे लागते. मागील पाच वर्षात विरोधी पक्ष राज्यपाल यांच्याकडेच म्हणणे मांडण्यासाठी जात असल्याची आठवणही यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी करुण दिली.आम्ही जनतेच्या हितासाठी आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी राज्यपाल यांना भेटतच राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.