ठाकरे सरकारमधील गृहमंत्रालयाचा बहुमानही नागपुरलाच

महाराष्ट्र
 31 Dec 2019  662

अनिल देशमुख नामधारी गृहमंत्री राहणार? 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 31 डिसेंबर 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील गृहमंत्रालय हे राष्ट्रवादीच्या ताब्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांच्या भंडानामुळे राष्ट्रवादीचे नागपुरचे नेते अनिल देशमुख यांना फायदा झाला आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या भंडानामुळे का होईना नागपुरला दुसऱ्यांदा गृहमंत्रालयाचा बहुमान मिळाला जरी असला तरी तो बहुमान केवळ नामधारी असेल ? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

          राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार विराजमान झाले असून सोमवारी पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. तिन्ही पक्षांच्या खाते  वाटपात गृहमंत्रालय आपल्या पदरात पाडून घ्यायला राष्ट्रवादीला यश आले. मात्र राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांत गृहविभाग मिळावे यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. त्यामुळे राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या गटाच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा केला आहे. नागपुर येथील राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना गृह मंत्रालय देण्याचे ठरले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार मध्ये मुख्यमंत्री पद आणि गृह मंत्री पदही फडणवीस यांच्या माध्यमातून नागपुराला होते. तेच गृहमंत्रालय ठाकरे सरकारमध्येही नागपुरलाच मिळणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे गृहमत्रांलय दिले जात असले तरी त्यावर फळीतील त्या तीन नेत्यांचे वर्चस्व अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी अधिकारी ही त्यांच्याच सुचनेनुसार नियुक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख हे केवळ नामधारी राहणार ? अशी चर्चा पक्षातील नेत्यांत सुरु झाली आहे.