राष्ट्रवादीची 77 उमेदवारांची पहिली तर भाजपची 14 उमेदवारांची दूसरी यादी जाहीर

महाराष्ट्र
 02 Oct 2019  503

राष्ट्रवादीची पहिली 77 उमेदवारांची तर भाजपची 14 उमेदवारांची यादी जाहीर 

* तावडे, खडसे, मेहता यांना डच्चू?

* पडवळ विरुद्ध अजितदादा तर पुसद मध्ये नाईक विरुद्ध नाईक 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 2ऑक्टोबर 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेसवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा 2 दिवसाचा अवधी उरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 77 उमेदवारांची पहली यादी तर भाजप पक्षाने 14 उमेसवारांची दूसरी यादी जाहीर केली. यात. भाजपने काही जेष्ठ नेत्यांना डावलले आहे.

  भाजप पक्षाने दुसऱ्या यादीत  जेष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना अद्यापही उमेदवारी दिली नसल्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्यामुळे नेमक भाजप ला या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे. हे मात्र गुलदसत्यात आहे.

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ज़ाहिर केलेल्या यादीत कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार विरुद्ध मंत्री राम शिंदे असा सामना रंगनार आहे.धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना रंगनार आहे.बारामतीतुन अजित पवार यांना उमेदवारी दिली तर भाजप पक्षाने गोपीचंद पडवळकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजप पक्षाने उल्हासनगर मध्ये माजी आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस ने भरत गंगोत्री यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कलानी परिवार ना घर का ना घाट का अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. दुसरीकडे पुसद मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इंद्रनील नाईक तर भाजप ने त्यांचे चुलत बंधू आमदार निलय नाईक यांना उमेदवारी दिल्याने सामना जोरदार रंगनार आहे.

उमेदवारांची यादी