राजू शेट्टी यांना जोरदार धक्का

महाराष्ट्र
 26 Sep 2019  599

राजू शेट्टी यांना यांना धक्का,रविकांत तुपकर भाजप मध्ये?

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 26 सप्टेंबर 

 

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जोरदार धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रविकांत तुपकर हे गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याने येत्या 2 दिवसात तुपकर भाजप वासी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

          लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीकडे  जोरदार मागणी केली होती.परन्तु फार आग्रह न धरल्याने सदर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आला होता. त्यामुळे नाराज रविकांत तुपकर भाजपच्या गळाला लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता पाहता तुपकर भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून  तुपकर मुंबईत असल्याचे समझते.