विशेष विमानाने मुख्यमंत्री-खा.उदयनराजे दिल्लीला रवाना

महाराष्ट्र
 14 Sep 2019  880

घड्याळ सोडले अन खा. उदयनराजे कमळकडे वळले 

* मुख्यमंत्र्यांसह खा. उदयनराजे विशेष विमानाने दिल्लीत 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 14 सप्टेंबर 

      राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घड्याळ सोडले अन कमळकडे वळले आहे. शनिवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे खा. उदयनराजे यांना दिल्लीत नेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खा. उदयनराजे भोसले यांच्यासोबत शुक्रवारी रात्रीच विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले आहे.

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे खा. उदयनराजे भोसले हेही भाजपात जाणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी राजे यांची समझुत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु खा. उदयनराजे यांनी घड्याळ सोडून कमळ हातात घेण्याचे निश्चित केल्याने अखेर भाजप प्रवेशासाठी शनिवारचा  मुहूर्त निश्चित झाला. सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकी सोबतच घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.