ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

महाराष्ट्र
 13 Sep 2019  497

अखेर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 13 सप्टेंबर 

राज्य सरकारने जाहीर केल्या प्रमाणे कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी पुढाकार घेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावांने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश शासनाने निर्गमित केला  आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशवराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांनी आयुष्यभर संघर्ष केला, लढा दिला. सरकारने त्यांच्या नांवाने स्थापन केलेले ऊसतोड महामंडळ हा राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. ऊसतोड   कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी महामंडळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी ऊसतोड संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सुरूवातीला महामंडळा ऐवजी ऊसतोड कामगार योजना करण्यात आली होती, परंतु ऊसतोड मजूरांच्या भावना लक्षात घेऊन  पंकजा मुंडे यांनी महामंडळाच स्थापन व्हावे यासाठी मागणी केली होती.

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ’ असे नांव या महामंडळाचे आता असणार आहे, या महामंडळा करिता आकस्मिकता निधीमधून १४५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांच्या भावना लक्षात घेऊन मुंडे साहेबांच्या नांवाने महामंडळ स्थापन केल्याबद्दल कामगारांनी आनंद व्यक्त केला आहेत.