जि.प. निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र

विधिमंडळ
 06 Jul 2021  516

* मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार 

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

    लोकदूत वेबटीम 

     मुंबई  6  जुलै 

 

राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणूका घेण्यात येणार आहेत.राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाता दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकांबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.