ओबीसी आरक्षणाची धुरा छगन भुजबळांच्या खांद्यावर

मुंबई
 05 Jan 2022  236


राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवार यांनी घेतली आढावा बैठक

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 जानेवारी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची न्यायालयीन लढ्याची जबाबदारी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचेवर टाकण्यात आली आहे. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत ही पक्षाची भूमिका यापुढे कायम राहील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाचे मंत्री व नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली. मलिक म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीरे व कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये, असा निर्णय झाल्याचे मलिक यांनी सांगितले.

आजच्या बैठकी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. संपर्क मंत्री यांच्या जबाबदारी वाढवण्यात आल्या आहेत.  त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा अद्याम महामंडळाचा मुद्दा मार्गी लागला नाही. त्यामुळे महामंडळ नेमणूक बाबत नाव घेण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत नाव जाहीर करणार असल्याचही मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक तीन तास चालली.