माजी मंत्री भाजप आ. सुरेश धस यांचेवर मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई
 21 Dec 2021  220

भाजप आमदार सुरेश धस यांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

एसआयटी मार्फत घोटाळ्याची चौकशी सुरु

लोकदूत वेबटीम 

मुंबई 21 डिसेंबर 

भाजपचे विधान परिषद आमदार आणि माजी  मह्सूल राज्यमंत्री सुरेश धस, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी (जि. बीड) तालुक्यातील देवस्थानाची ५१३ एकर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी येथे केला. या प्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची  (एसआयटी) नेमणूक केली असून  एसआयटीने दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती मलिक यांनी दिली.
आष्टीतील तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांच्या ५१३ एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन त्यावर खासगी नाव चढवण्यात आले. त्यांनतर जमिनीचे तुकडे पाडून हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा दावाही मलिक यांनी केला. २०१७ पासून  जमीन हडप करण्यचा उद्योग सुरु होता. २०१७ ते  २०२० या कालावधीत  देवस्थानाच्या जमिनी गिळंकृत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मलिक यांनी भाजपच्या आजी- माजी आमदारांवर आरोप करून खळबळ उडवून दिली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच मलिक यांनी जमीन घोटाळ्याची माहिती उघड करत  भाजपच्या आक्रमणातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमिनीही सोडल्या नाहीत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांनी आष्टी तालुक्यातील दहा देवस्थानांचा जमीन घोटाळा समोर आणला.  खाडे यांनी या दहा प्रकरणांची गृह, महसूल आणि ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र मल्टिस्टेट को.ऑ.सोसायटीचा या  घोटाळ्यात सहभाग आहे. या सर्व जागा हडप करताना या सहकारी संस्थांच्या माध्यमातून बगलबच्चे तयार करण्यात आले आणि  त्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यातून खरेदी खत करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

महाराष्ट्र वक्फ  बोर्डाच्या माध्यमातून ११ एफआयआर दाखल केले आहेत. मंदिर आणि मशिदीच्या जागेवर फेरफार करुन, खासगी नावे चढवून,  तुकडे पाडून  ही जमीन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, पुणे, ठाणे आणि बीड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे  मलिक यांनी सांगितले.


चौकट
घोटाळा झालेल्या जमिनीची माहिती
वक्फ बोर्ड :  चिंचपूर मस्जिद इनाम - ६० एकर, रुई नालकोल - बुहा देवस्थान - १०३ एकर, देवीनिमगाव - मस्जिद इनाम - ५० एकर
हिंदू देवस्थान : मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थानची ४१ एकर ३२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, श्रीराम देवस्थान २९ एकर, कोयाळ येथील श्रीराम देवस्थान १५ एकर, चिंचपूर रामचंद्रदेव देवस्थान ६५ एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि