युवासेनेच्या किचन मधून ठरवणार कुलगुरू ?

मुंबई
 16 Dec 2021  213

भूखंड लाटण्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल


भाजप आमदार आशीष शेलार यांचा आरोप  


विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार

लोकदूत वेबटीम 
मुंबई 16 डिसेंबर 


मुंबई विद्यापीठाचे कोट्यवधी  रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष्य करण्याचे काम ठाकरे सरकारचे असून  भूखंड लाटण्यासाठीच विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी येथे केला. एसआरएसाठी भूखंड देणे, काही नोंदणीकृत आणि नोंदणी  नसलेल्‍या काही संस्‍थांना भूखंड देणे सुरू आहे. त्‍यामुळे आपल्‍या मर्जीतील कुलगुरू विद्यापीठात बसविण्याचे घाटत आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली.
 विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य सरकारने  आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, अशी भीती व्यक्त करताना   एखाद्या सचिन वाझे सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? असे सवाल शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
कुलगुरू निवडीचे राज्यपालांचे अधिकार काढून घेण्याचे काम सरकारने केले आहे. पू र्वीच्‍या कायद्यानुसार कुलगुरू निवड करण्‍यासाठी राज्‍यपाल शोध समिती गठीत करत. या  समितीमध्‍ये  सवोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्‍त न्‍यायमूर्ती किंवा उच्‍च न्‍यायालयातील निवृत्‍त न्‍यायाधीश, बरोबरीने शिक्षण तज्ञ, पद्म पुरस्‍कार प्राप्‍त यासह उच्‍च शिक्षण विभागाचे सचिव यांचा समावेश असायचा.  ही समिती कुलगुरुपदासाठी अर्जदार व्‍यक्‍तींच्‍या कागदत्रांची छाननी करून त्‍यातील पाच नावांची शिफारस राज्‍यपालांना करीत असे. ठाकरे सरकारला हे मान्‍य नाही. नवीन बदलानुसार आता  कुलगुरू नियुक्‍तीसाठी सरकार एक समिती गठीत करणार असून त्‍यातील सदस्‍य  राज्‍य सरकारच ठरवणार आहे. त्‍या समितीकडून  जी नावे सूचवली जातील त्‍यातील दोन नावे कुलपती म्‍हणून राज्‍यपालांकडे मांडली जाणार आहेत. याचा सरळसरळ राजकीय अर्थ असा आहे की, यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवले जातील, अशी टीका शेलार यांनी केली.
  जो राजाबाई टॉवर एक काळ इंग्रजांसमोरही दिमाखात उभा राहिला, त्‍या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर झुकवण्‍याचे काम ठाकरे सरकार करते आहे. सरकारचा निर्णय हा विद्यापीठांच्‍या स्‍वायत्‍तेवर  आक्रमण करणारा  आहे.  यापूर्वी विद्यापीठाच्‍या निविदांमध्‍ये सुध्‍दा हस्‍तक्षेप करण्‍यात आला होता. विद्यापीठातील प्राध्‍यापक मंत्री कार्यालयात घेऊन पगार मात्र विद्यापीठाने द्यावे असेही करण्‍यात आले. अशा प्रकारे विद्यापीठांच्‍या निधीवर आक्रमण करण्‍यात आली असून आता एक पाऊल पुढे टाकण्‍यात आले आहे, असेही शेलार यांनी सांगितले.
 करण जोहरच्या  पार्टीमध्‍ये एक मंत्री होते का?
दरम्यान, करण जोहर यांच्या घरी झालेल्या  पार्टीत  तिघांना कोरोना झाला,  अशा बातम्या मी वाचल्या. या बातम्या सत्‍य मानून मी महापालिकेच्या  अधिका-यांशी बोललो.  अधिकारी सांगत आहेत कि  त्‍या पार्टीत आठच लोक होते. हे आठच लोक होते हे कशावरून ठरवले?,  असा  मी प्रश्न पालिकेला विचारला . यावर त्यांनी सांगितले की, आम्‍ही बाधीत लोकांशी चर्चा केली. सीमा खान त्‍यांनी काही नावे सांगितली. काही नावे गाळली होती. मग अधिकारी म्‍हणाले, आम्‍ही स्‍वतः करिना कपूर यांच्‍याशी बोललो. त्‍यांनी काही नावे सांगितली. यावरून असे दिसते की, यामध्‍ये संभ्रम निर्माण होतो आहे. म्‍हणून आम्‍ही पालिकेला प्रश्‍न विचारला की, सदर इमारतीचे सीसीटीव्‍ही फुटेज घेतले आहे का? त्यावर  पालिकेने उत्‍तर नाही असे दिले. त्‍यामुळे संशय बळावत असून ज्‍या पध्‍दतीने संभ्रमाचे वातावरण दिसते आहे त्‍यावरून पालिकेला असा सवाल आहे की, या पार्टीत राज्‍य सरकारमधील कोणी मंत्री होता का?, हा संशय बळावयाचे नसेल तर त्‍या इमातीचे सीसीटीव्‍ही फुटेज