भारत माता की जय म्हणणारेच भारत मातेला विकता - पटोले

मुंबई
 20 Oct 2021  202


-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांचा भाजपला टोला
 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 20 ऑक्टोबर 


भारतमाता कोण आहे? हे ज्यांना माहीत नाही तेच लोक ‘भारत माता की जय’ म्हणत भारतमातेला विकत आहेत. पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा व त त्यांच्या विचाराचा भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान होते. हे सोप्या भाषेत पटवून देणारे कार्यक्रम राज्यभर राबविले जातील. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. या कार्यक्रमांमुळे नेहरु यांच्याबद्दल अपप्रचार खोटा असून वस्तुस्थिती जनतेला समजेल, असा दावा पटोले यांनी केला.

प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरु: कल आज और कल’ हे व्याख्यान व पुस्तकाचा प्रकाशन समारंभ परळ येथील टिळक भवन येथे आज आयोजित करण्यात आला होता, यावेळी पटेले बोलत होते.
 
यावेळी भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक म्हणाले की, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. पटोले धडाडीचा नेते असून काँग्रेस संघटन कसे मजबूत करता येईल यावर त्यांचा विशेष भर आहे असे सांगून  2014 च्या निवडणुकीत थापा मारून ज्यांनी सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला, नायक नाही तर खलनायक निघाला असा आरोप वासनीक यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला.

भारतीय संस्कृती व सभ्यता धोक्यात आली असून ‘आयडिया ऑफ इंडिया’ सोडून ‘दुसरी आयडिया ऑफ इंडिया’ थोपवली जात आहे. आणि ते देशासाठी धोकादायक आहे, असा दावा प्रा. पुरुषोत्तम आगरवाल यांनी आपल्या व्याख्यानात केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांच्या ‘कोण आहे भारतमाता’? या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर विनायक देशमुख यांनी आभार मानले.
------------------------------
मुख्य प्रवक्तेपदाच्या निवडीवरून प्रदेश काँग्रेसमधील धुसफूस मंगळवारी समोर आली होती. प्रवक्ते सचिन सावंत नाराज झाले आहेत. त्यांनी   प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.