समीर वानखेडेवर पाळत ? गृहमंत्र्यांच्या खुलासा

मुंबई
 12 Oct 2021  170

-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा खुलासा
-वानखडे अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अधिकारी 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 12 ऑक्टोबर 


अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. वानखेडे यांनी त्यासंदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकाचींही भेट घेतली. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या तपास यंत्रणा पुन्हा एकदा आमनेसामने आल्या आहेत.

समीर वानखेडे यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. पुन्हा एकदा विरोधकांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री वळेस- पाटील यांनी वानखेडे यांचे आरोप फेटाळले आहेत.

वळसे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'मला वाटत नाही की मुंबई पोलिस वानखडे यांच्यावर पाळत ठेवत असतील. तशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. वानखेडे यांच्या आरोपांविषयी मला काही माहिती नाही. माहिती घेऊन मी त्यावर बोलेन,' असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सीबीआयचे संचालक सुबोध जैस्वाल यांना यांना मुंबई पोलीसांनी समन्स बजावले आहे. त्यावरही दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले.  'सीबीआय डायरेक्टर म्हणून त्यांना समन्स बजावलेले नसून ते साक्षीदार म्हणून समन्स बजावले आहेत. रश्मी शुक्ला प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. त्यावेळी ते डीजी होते,' असेही वळसे पाटील म्हणाले.

अरबी समुद्रात मागच्या आठवड्यात क्रुजवर छापा घातला होता. त्यामध्ये ११ आरोपींना अटक केली आहे. त्यात अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यनला अटक करण्यात आलेली आहे. वानखेडे कार्यरत असलेली एनसीबी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली तपास संस्था आहेत.
--------
-वानखेडेंचा आरोप काय?
समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले.  स्मशानभूमीत आईच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना दोन संशयीत व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचे वानखेडेंना लक्षात आले. पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेजही त्यांनी मिळवले.
-------