चिपी विमानतळाचे श्रेय भाजप आणि आमचे - ना.नारायण राणे

मुंबई
 08 Oct 2021  203

-केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नारायण राणे यांचा दावा


-विमानतळ उद् घाटनाच्या पूर्वसंध्येला वादाची ठिणगी

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 8 ऑक्टोबर 


रत्नागिरी जिल्ह्यात उभे राहिलेल्या चिपी या कोकणातील पहिल्या विमानतळाचे सर्व श्रेय भाजप व माझे एकट्याचे आहे, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला.  

चिपी विमानतळाचे उद्या उद्धघाटन होत आहे. या निमित्ताने विमानतळाच्या श्रेयाचा वाद चांगलाच पेटला आहे. विमानतळ उद् घाटनाच्या पूर्वसंध्येला भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी चिपी निमानतळासाठी कोणी मेहनत घेतली आणि श्रेय कोण घेत आहे, त्याबाबत रोखठोक भाष्य केले.

आमदार म्हणून, मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्हयाचा सर्वांगिण विकास मीच केला. त्यात शिवसेनेचा काही संबंध नाही. आता लोकार्पंण होत असलेल्या चिपी विमानतळाचे काम मीच केले. मात्र विमानतळ उद् घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेत माझे नाव तिस-या क्रमांकावर टाकण्यात आले. नावाची शाईसुद्धा फाटली आहे, असा आरोप राणे यांनी केला.

राणे म्हणाले, वास्तविक राजकारणात आणि राजशिष्टाचारात मुख्यमंत्री उदधव ठाकरे आणि हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मी ज्येष्ठ आहे. तरी मला डावलले आहे, यावरून शिवसेनेची संकुचित वृत्ती दिसते, असा दावा राणे यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्हयाचा विकास आपण केल्याचे राणे म्हणाले. मी १९९० साली आमदार झालो, नंतर मंत्री आणि मुख्यमंत्रीही झालो. सिंधुदुर्गात रस्ते नव्हते, शिक्षणाची सोय नव्हती. रूग्णालय नव्हते. पाण्याचाही मोठा प्रश्न होता. मुख्यमंत्री असताना मी ११० कोटी खर्च करून तालुक्या-तालुक्यांना जोडणारे २८ पूल बांधल्याचा दावा राणे यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून मीच घोषित करायला लावला. त्याद़ष्टीने सर्व नियोजन आपण केल्याचेही राणे म्हणाले. आता जी चिल्लर बाजारात फिरतेय, तेव्हा ती कुठे होती, असा सवाल राणे यांनी शिवसेनेला केला.

चिपी विमानतळासाठी अगदी सुरूवातीपासूनच मी प्रयत्न केले. यात शिवसेनेचा काहीही संबंध नाही. लोकार्पण कार्यक्रमात मी हे सांगणार आहे. मुख्यमंत्री उद् घाटनाला येत आहेत, त्यांच्याशी वैर नाही. पण हे जे आता मिरवत आहेत, त्यांनी मिरवू नये, असा टोलाही राणे यांनी विनायक परब, सुभाष देसाई व अनिल परब यांचे नाव न घेता लगावला.
-------------------------------------
सिंधुदुर्गात‍ विकास कामे सुरू झाली. कॉन्ट्रॅक्टरच्या गाडया आल्या की लगेच अडवल्या जायच्या. त्यांच्याकडून शिवसेनेच्या पदाधिका-यांनी स्वत:साठी कार घेतली, त्याचे फोटोही आहेत माझ्याकडे. विकासकामात देखील यांनी पैसे खाल्ले, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.
-----------------