ठाकरे राणे एकाच व्यासपीठावर

मुंबई
 08 Sep 2021  231

चिपी विमानतळ उद्घघाटन; राणे ठाकरे एकाच व्यासपीठावर

-विमानतळ राज्याने बांधले; उद्योगमंमंत्री देसाई 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 सप्टेंबर 

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. मंत्री  राणे यांनी विमानतळ उद्घाटनास मुख्यमंत्र्यांची आवश्यक नसल्याचे वक्तव्य केले असता, त्यावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विमानतळ राज्य सरकारचे असल्याचा खुलासा केला. शिवाय  या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित असतील, असे बुधवारी स्पष्ट केले. सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राणे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याचे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे.

कोकणचा सर्वांगीण विकासाला साधण्यासाठी  सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी देसाई म्हणाले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एम आय डी सी) विमानतळ प्रकल्प हाती घेऊन काम पूर्ण केले. एकुण 286 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली असून 520 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विमान पत्तन प्राधिकरण नागर विमानन महानिदेशालय यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने आता प्राप्त झाले आहेत.

यावेळी नारायण राणे यांचे नाव घेण्याचे देसाई यांनी टाळले. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून या कार्यक्रमास उपस्थित असतील. शिंदे यांच्या व्यतीरिक्त कोण केंद्रीय मंत्री उपस्थित असणार आहे, याची माहिती नाही, असे देसाई यांनी सांगितले. विमानतळ उद्योग विभागाचा आहे. त्यामुळे त्याचा मंत्री म्हणून मी स्वागताला असेन, असे देसाई यांनी सांगतिले.

 

*. नारायण राणे यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विमानतळ उद् घाटनाची तारीख जाहीर केली होती. तसेच मुख्यमंत्री या कार्यक्रमास असण्याची गरज नाही, असा दावा त्यांनी केला होता.

* सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राणे यांचे दावे खोडून काढले. राणे आता मंत्री झालेत, मी गेली ७ वर्षे विमानतळाचा पाठपुरावा करत असल्याचा दावा त्यांनी केला.

* मुख्यमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याबद्दल राणे यांना नुकतीच अटक झाली होती. त्यानंतर नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळ उद्घघाटन प्रसंगी एका व्यासपीठावर प्रथमच येत आहेत.