हेमंत नगराळे यांच्याकडे पोलिस महासंचालक पदचा अतिरिक्त पदभार

महाराष्ट्र
 07 Jan 2021  425

* सुबोध कुमार जायस्वाल झाले कार्यमुक्त 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 7 जानेवारी 

राज्याचे पोलिस महासंचालक (dgp )सुबोध कुमार जायस्वाल (subhod kumar jaayswal ) यांना आज महाराष्ट्र सरकारने कार्यमुक्त केले असून जेष्ठ भापोसे अधिकारी  हेमंत नगराळे (hemant nagarale) यांच्याकडे पोलिस महासंचालक (dgp ) पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जाहिर केला आहे.

    केंद्र सरकारने राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल (subodh kumar jayaswal)यांची सीआयएसएफ (cisf) च्या महासंचालक पदावर नियुक्ती केल्याने त्यांना दिल्लीत जाण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ पाऊले उचलली. राज्य सरकार आणि पोलिस महासंचालक यांच्यात मोठ्या प्रमाणात विविध कारणाने संघर्ष होत होता.त्यामुके पोलिस महासंचालक पदावरून दूर होऊन जायस्वाल यांनी दिल्लीत जाण्यासाठी राज्य सरकार कडे अर्ज दाखल केला होता.त्यामुळे दिल्लीत केंद्र सरकारने त्यांची गृहविभागात (home) नियुक्ती केली. त्यामुळे जायस्वाल (jayaswal ) यांना कार्यमुक्त करण्यासाठी मंत्रालयात हालचाली सुरु झाल्या. त्यात हेमंत नगराळे (hemant nagarale ) यांना राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतितिक्त पदभार देण्यात आला.