अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे

विधिमंडळ
 27 Dec 2021  449

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये

-सल्लागार समिती निर्णय घेणार

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 27 डिसेंबर 


कोविडमुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबईत घेण्यात आले. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयाने निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन कालावधीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दैनिक भत्त्यांमध्ये वाढ होण्याबाबतचा तारांकित प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता.

त्यावर उत्तर देताना अजित  पवार म्हणाले की, नागपूर अधिवेशनात उपस्थित राहणारे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारमार्फत करण्यात येत असल्याने दैनिक भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीसुद्धा या विषयाबाबत पुन्हा एकदा माहिती घेतली जाऊन आवश्यकता वाटल्यास शासन निर्णयामध्ये बदल करण्यात येईल.

..........................