चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना टोला

मुंबई
 23 Jan 2022  184

पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

लोकदूत वेबटीम 

मुंबई 23 जानेवारी 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी रविवारी लागवला.  पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते तीव्र निषेध व्यक्त करतील, असा इशारा त्यांनी दिला.

नाना पटोले यांनी आज नाशिकमध्ये बोलताना वादग्रस्त विधान केले. 'ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते', असे पटोले म्हणाले. या विधानावरून भाजप आक्रमक झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील
 म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आपण याचा निषेध करतो.
 
मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा  चंद्रकांत पाटील यांनी दिला.
 
नागपूरमध्ये आंदोलन

दरम्यान, पटोले यांचा निषेध म्हणून आज नागपूरमध्ये भाजपच्यावतीने पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.