मंत्रालयात आमदारांना दंड

मुंबई
 14 Dec 2021  201

विनामास्क फिरणाऱ्या आमदाराला दंड

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर मंत्रालयात कारवाई

लोकदूत वेबटीम 

मुंबई 14 डिसेंबर 


राज्यावर कोरोनाचे नवे संकट ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य  सरकारकडून कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केले आहे. पण, लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडला आहे.

मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर मंगळवारी कारवाई केली. मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत.  मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी २०० रुपयांचा दंड ठोकला आहे. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचं मंत्रालयात कौतुक होतं आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी नियम हे सर्वांना सारखेच असतात असे म्हणत काही आढेवेढे न घेता दंड भरला.

दरम्यान, महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
----
माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी कायदा मोडल्याने कारवाई झाली त्यात काही गैर नाही. मी मास्क लावलेला नसल्याने पोलिसांनी माझ्याकडून २०० रुपये घेतले. खरे तर या सरकारमध्ये सर्वत्र जोरदार वसुली सुरु आहे. परंतु या कायद्याच्या वसुलीचे मी कौतुक करेल. मी माझ्या मतदारसंघात गरिबांना लुटण्याचे स्टिंग मी केले होते. या सरकारने त्यात लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी. आजच्या कारवाईचे काही वाईट वाटत नसल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.