मुख्यमंत्र्यांनी टोचले आमदार आणि अधिकाऱ्यांचे कान

महाराष्ट्र
 10 Aug 2019  800

शासकीय मदतीवर जाहिरातबाजी करू नका..मुख्यमंत्र्यांनी टोचले कान 

* शासकीय मदतीवर फ़क्त महाराष्ट्र शासनच लिहा 

* फोटोसहीत स्टिकर लावण्याची गरज नाही 

लोकदूत वेबन्यूजटीम 

सांगली  10ऑगस्ट 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाचे आमदार आणि अधिकाऱ्यांचे कान टोचले आहे. शासकीय मदत आहे हे पुरग्रस्तांना कळण्यासाठी केवळ महाराष्ट्र शासन असेच नमूद करावे. कुणीही फोटो अथवा नाव छापू नये  असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

      कोल्हापुर येथील इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर स्थानिक प्रांत शिंगटे आणि तहसीलदार भोसले यांचे नाव आणि फोटो असलेले स्टिकर लावून शासनाने  जाहिर केलेली मदत पुरग्रस्तांना पोहचविले जात असल्याचे सोशल मीडियावर पसरताच जोरदार  टिका झाली. यावर अनेकांनी संतापही व्यक्त केला. यावर सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी समबंधित आमदार अधिकारी यांचे कान टोचले.शिवाय शासकीय मदतीवर केवळ महाराष्ट्र शासन असेच नमूद करावे असेही निर्देश दिले.