देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभेच्या निवडणूक प्रभारी पदी

महाराष्ट्र
 08 Sep 2021  204

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 सप्टेंबर 

आगामी काळात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभारीपदी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सह प्रभारी पदी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   फेब्रुवारी 2022 अखेरीस 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे गोवा विधानसभेसह उत्तर प्रदेश,मणिपूर,पंजाब आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा डिसेंबर अखेरीस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपने पाचही राज्याच्या प्रभारी पदी नियुक्त्या केल्या असून गोवा विधानसभेच्या प्रभारीपदाची  जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचेकडे सोपविण्यात आली आहे. सध्या गोवा भाजपचे 27 आमदार विधानसभेत असून 1 अपक्ष असे 28 सदस्यांचे पाठबळ आहे. काँग्रेस पक्षाकडे 5 तर 2 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीकडे 1 , फॉरवर्ड गोमंतक पार्टी 3 आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे संख्याबळ आहे.