नाना पटोले यांची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी

महाराष्ट्र
 05 Feb 2021  271

* कार्याध्यक्षपदी मोघे,हंडोरे,प्रणिती शिंदे,बसवराज पाटील 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 फेब्रुवारी 

गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा मुहूर्त शनिवारी निघाला. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले नाना पटोले यांची कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती हायकमांड ने केली आहे. तर नव्या 5 कार्याध्यक्ष पदाची नियुक्तिही करण्यात आली असून माजी मंत्री शिवाजीराव मोघे,आमदार प्रणीती शिंदे,बसवराज पाटील,यांचा समावेशaआहे.